पडोली पोलिस ठाण्यातील शिपाई एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
अवैध दारूविक्रेत्याकडून दहा हजारांची लाच स्वीकारताना पडोली पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.
  गणेश श्रीराम जोगदंड  (३०) असे लाचखोर पोलीस शिपायाचे नाव आहे. यातील तक्रारदार हा रय्यतवाडी चंद्रपूर येथील रहीवासी असुन  तो  अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करतो.  त्याला पोलिस शिपाई गणेश जोगदंड याने दारूची वाहतुक करित असताना पकडले असता   तक्रारदारास दारू वाहतुकीचा व अवैध दारू विक्रिचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी व त्यावर कार्यवाही न करण्याच्या कामाकरीता प्रती महिना १० हजार रूपये लाचेची मागणी केली. तक्रारदार याची लाच रक्कम देण्याची ईच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथील अधिकाऱ्यांना भेटून तक्रार नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर चे पोलीस निरीक्षक   निलेश सुरडकर यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीय रित्या शहानिशा करून पोलीस शिपाई जोगदंड विरूध्द योजनाबध्दरित्या    काल  ७ सप्टेंबर रोजी  लाच रक्कम स्विकारतांना  रंगेहात पकडले  पोलीस ठाणे पडोली जि. चंद्रपूर येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. 
पोलीस शिपाई गणेश जोगदंड याच्या पडोली जि. चंद्रपूर येथील निवासस्थानाची  एसीबीद्वारे झडती सुरू आहे.  सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक   रश्मी नांदेडकर व अपर पोलीस अधीक्षक   राजेश दुद्दलवार,   पोलिस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या  मार्गदर्शनात  पोलीस निरीक्षक  निलेश सुरडकर, पोहवा मनोहर एकोणकर नापोकाॅ. संतोष येलपूलवार, रवि ढेंगळे, संदेश वाघमारे, रोशन चांदेकर, नरेश नन्नावरे यांनी केली आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-09-08


Related Photos