जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांनी घेतला भामरागड तालुक्यातील पुरस्थितीचा आढावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
मागील तीन दिवसांपासून भामरागडचा संपर्क खंडीत आहे. तर ६० टक्के भामरागड गाव पाण्याखाली गेले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी भामरागड तालुक्यातील पुरपरिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी आणि  पोलीस अधीक्षक यांनी हेलिकॉप्टरने पाहणी केली. 
पामुलगौतम, पर्लकोटा नदीला पुर आल्यामुळे भामरागडला पाण्याने वेढा घातला आहे. यामुळे ५०० ते ६०० नागरीकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. भ्रमणध्वनीसेवा सुध्दा बंद करण्यात आली आहे. प्रशासन परीस्थितीवर लक्ष ठेवून असून तहसीलदार अंडील, उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनात शासकीय यंत्रणा कार्यरत आहेत.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-07


Related Photos