जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली छल्लेवाडा जवळील पुलाची पाहणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / अहेरी :
अतिवृष्टीमुळे तालुक्यातील छल्लेवाडा जवळील नाल्यावरील पुल खचून गेला. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. या पुलाची आज ७ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी पाहणी केली. दरम्यान प्रशासनासोबत संपर्क साधून तातडीने पुलाची दुरूस्ती करण्याची मागणी केली.
पुल खचल्यामुळे अनेक गावांच्या नागरीकांची वाताहात झाली आहे. पुलाची दुरूस्ती लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. यामुळे आज जि.प. उपाध्यक्षांनी तातडीने धाव घेवून पुलाची पाहणी केली. तसेच परिसरातील अनेक गावांना भेटी दिल्या.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-07


Related Photos