गणपती विसर्जनादरम्यान बारसेवाडा येथील इसम नाल्यात वाहून गेला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / मुलचेरा :
गडचिरोली जिल्ह्यात पुराने हाहाकार माजविला असून कालपासून जिल्ह्यात ३ इसम वाहून गेले आहेत. आज तालुक्यातील बारसेवाडा येथील एक इसम गणपती विसर्जनादरम्यान नाल्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे.
भगिरथ मोतिराम हिवरकर (४०)  हा घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गावातील काही नागरीकांसोबत कालापाल नाल्यावर गेला होता. दरम्यान त्याचा पाय घसरल्याने तो नाल्यात वाहून गेला. या इसमाचा शोध मुलचेरा पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन चमुद्वारे सुरू असल्याची माहिती मुलचेरा पोलिसांनी दिली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-07


Related Photos