महत्वाच्या बातम्या

 आगामी काळात गडचिरोली जिल्हा होणार नेक्स्ट स्टील ऑफ इंडिया : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : येत्या काळात गडचिरोली जिल्हा हा नेक्स्ट स्टील ऑफ इंडिया होणार, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. गडचिरोली पोलीस दलामार्फत आपला जिल्हा, आपला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होणार, असे देखील ते यावेळी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, येत्या काळात गडचिरोली जिल्हा हा नेक्स्ट स्टील ऑफ इंडिया होणार आहे. मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती या माध्यमातून होणार आहे. या माध्यमातून महाराष्ट्राच्या तिजोरीला गडचिरोली जिल्ह्याचे देखील मोठे योगदान असणार आहे. महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा गडचिरोली जिल्हा आहे. आता उलट म्हणावं लागेल महाराष्ट्रातला पहिला जिल्हा हा गडचिरोली जिल्हा आहे. गडचिरोलीतून महाराष्ट्राची सुरुवात होते.

गडचिरोली जिल्ह्यातील विकासाची यात्रा आता सुरू -

गडचिरोलीत मेडिकल कॉलेज, विमानतळ, रेल्वे येणार आहे. सोबतच समृद्धी महामार्गसुद्धा गडचिरोलीपर्यंत येत आहे. त्यामुळे कनेक्टिव्हिटी ही मुंबईला देखील जोडणार आहे. गडचिरोलीला पोर्टशी जोडण्याकरिता एक अभ्यास गट निर्माण केला आहे. हा अभ्यास गट गडचिरोलीच्या नद्यांमधून जहाजाची वाहतूक करून आंध्र प्रदेशच्या फोर्टपर्यंत थेट कनेक्टिव्हिटी कशी निर्माण करता येणार याच अभ्यास करण्यासाठी हा अभ्यास गट निर्माण केला आह. त्यामुळे प्रचंड मोठा विकास होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात विकासाची यात्रा आता सुरू झाली आहे ही यात्रा आता थांबणार नाही.





  Print






News - Gadchiroli




Related Photos