दुसऱ्या विवाहातून झालेले अपत्यसुद्धा अनुकंपासाठी पात्र : केंद्रीय प्रशासकीय लवादाचा निकाल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
पहिला विवाह वैध असतानाही दुसऱ्या विवाहातून अपत्य झाले असल्यास ते अनुकंपासाठी पात्र ठरते, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा केंद्रीय प्रशासकीय लवादाने (कॅट) सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा आधार घेऊन दिला.
एका रेल्वे कर्मचाऱ्याला  पहिली पत्नी  असतांना दुसऱ्या महिलेशी    प्रेमसंबंध निर्माण झाल्याने मुलाचा जन्म झाला. महिलेला दुसऱ्या पत्नीचा दर्जा मिळाला. पण, कायद्यानुसार पहिला विवाह वैध ठरतो. १४ जानेवारी २००५ ला वडील सेवेत असतानाच मृत्यू झाला. त्या ठिकाणी आपल्याला अनुकंपा अंतर्गत नोकरी मिळावी, याकरिता दुसऱ्या पत्नीच्या मुलाने अर्ज केला. पण, रेल्वेने त्याची विनंती अमान्य केली. त्याने रेल्वे न्यायाधीकरणात अपील केले. न्यायाधीकरणाने रेल्वे विभागाचा निर्णय कायम ठेवला. याचिकाकर्त्याने कॅटमध्ये धाव घेतली. कॅटने सुनावणी घेतली. सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर लवादाने सर्वोच्च न्यायालयातील एका निकालाचा आधार घेऊन पहिला विवाह वैध असताना दुसऱ्या विवाहातून किंवा संबंधातील अपत्यालाही अनुकंपाचा अधिकार मिळत असल्याचा निर्वाळा दिला. तसेच या प्रकरणात रेल्वे विभागाला नोकरीत रुजू करून घेण्याचे आदेश दिले.  Print


News - Nagpur | Posted : 2019-09-07


Related Photos