गडचिरोली - नागपूर, गडचिरोली - चामोर्शी , आष्टी - चंद्रपूर सह जिल्ह्यातील अनेक मार्ग आजही बंदच


- भामरागड संपर्काबाहेर 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
मागील दोन दिवसांपासून झालेली अतिवृष्टी आणि गोसेखूर्द धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे  वैनगंगा नदीला पूर आला आहे. यामुळे वैनगंगा नदीच्या उपनद्या तसेच नाल्यांना दाब निर्माण झाला असून जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद पडले आहेत. आष्टी - चंद्रपूर मार्ग रात्री १० वाजतापासून बंद पडला आहे. तर गडचिरोली - नागपूर , गडचिरोली - चामोर्शी हे महत्वाचे मार्ग कालपासूनच बंद आहेत. 
जिल्ह्यातील कुरखेडा - वैरागड  - रांगी, अहेरी - देवलमरी, आलापल्ली - भामरागड, कमलापूर - रेपनपल्ली, आरमोरी - वडसा, शंकरपूर - बोडधा, फरी - किन्हाळा, एटापल्ली - आलापल्ली, अहेरी - सिरोंचा, भामरागड - लाहेरी, चातगाव - पेंढरी, मानापूर - पिसेवडधा, हळदी - डोंगरगाव, कोरची - घोटेकसा, धानोरा - मालेवाडा, चोप - कोरेगाव आदी मार्ग बंद आहेत.
 जिल्ह्यातील शेकडो गावे संपर्काबाहेर असून नागरीकांचे प्रचंड हाल होत आहे. अजून दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नागरीकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. काल दिवसभर प्रशासनाने १५० हुन अधिक नागरिकांना पुराबाहेर काढले. जिल्ह्यातील अनेक नागरिकांची घरे कोसळली. जिल्ह्यात दोघे जण वाहून गेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी काल ६ आणि आज ७ सप्टेंबर रोजी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-07


Related Photos