विदर्भात अतिवृष्टी , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्याचा नागपूर दौरा रद्द


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
पुढील काही तासांमध्ये  हवामान विभागाने विदर्भातील अनेक ठिकाणी  मुसळधार पावसाचा  अंदाज व्यक्त केला आहे. तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली गोंदिया जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी आज अतिवृष्टीचा हवामान विभागाचा अंदाज आहे.  तर यवतमाळ जिल्ह्यात उद्या   ७ सप्टेंबर रोजी  अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान  उद्या होणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा रद्द करण्यात आला आहे.
  नागपूरसह अमरावती, वर्धा, यवतमाळ, भंडारा आणि चंद्रपुरात विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. या बरोबरच अकोला, गडचिरोली आणि गोंदिया, वाशीममधील काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आज आणि उद्या अमरावती, भंडारा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2019-09-06


Related Photos