महत्वाच्या बातम्या

 आशा स्वयंसेविका यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार : मंत्री धर्मराव बाबा आत्राम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / आष्टी : ०३ फेब्रुवारी २०२४ रोजी चामोर्शी येथील पंचायत समितीमध्ये आयोजित शासकीय आढावा बैठकी दरम्यान पुष्पा वेंकटी बुर्ले महिला जिल्हा उपाध्यक्ष रा.काँ.पा गड. डॉ.नोमेश जुवारे जिल्हा उपाध्यक्ष रा.काँ.पा गड., डॉ.हेमंत भाकरे जिल्हा संघटन सचिव रा.काँ.पा गड., प्रणय बुर्ले विधानसभा अध्यक्ष रा.यु.काँ. गड. गडचिरोली यांच्या नेतृत्वात तालुक्यातील आशा स्वयंसेविका यांच्या राज्य भर सुरु असलेल्या वेतनवाढ आंदोलनासंदर्भात निवेदन देण्यात आले व चर्चा सुद्धा घडवून आणण्यात आली. 

त्यावेळी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या सोबत बैठक घेऊन वेतनाचा मार्गी लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असे सांगितले. त्यावेळी तालुक्यातिल संपूर्ण अधिकाऱ्यांसोबत पक्षाचे वैध्यकिय सेलचे तालुकाध्यक्ष डॉ.मिथुन राय सिडाम, सेवादलचे तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, बंडू मेश्राम, सागर जांपलवार व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos