धानोरा व चामोर्शी तालुक्यात दोन जण वाहून गेले, आरमोरी तालुक्यात आणखी १६ जणांना वाचविले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरूच असून सकाळपासून विविध भागातून अनेक घटना समोर येत आहेत. चामोर्शी आणि धानोरा तालुक्यात दोघे जण वाहून गेल्याची माहिती प्राप्त झाली असून आरमोरी तालुक्यातील चामोर्शी परिसरात आणखी १६ जणांना वाचविण्यात बचाव पथकास यश आले आहे.
रामदास मादगु उसेंडी रा. निमगाव ता. धानोरा आणि सुधाकर पोटावी (६०) रा. पाविलसनपेठ ता. चामोर्शी अशी वाहून गेलेल्या इसमांची नावे आहेत. दोघांचाही शोध सुरू आहे.
रामदास उसेंडी हा आरमोरी तालुक्यातील मेंढा येथील नाल्यावरून सकाळी ११.३०  वाजता वाहून गेला. तर सुधाकर पोटावी हा पोर नदीच्या पुरात वाहून गेला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आरमोरी तालुक्यातील चामोर्शी नाल्याच्या पुरामुळे शेतात काम करीत असलेले १६ जण अडकले होते. या नागरीकांना पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने सुखरूप बाहेर काढले आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-06


Related Photos