महत्वाच्या बातम्या

 कोरोना लस घ्या, नंतरच, मिळणार उपचार व औषधे : उपचार व औषधाविना घरी परतले नागरिक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : तालुक्यातील कोंढाळा आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातून हल्ली नागरिकांना दिली जाणारी तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लस घेतल्याशिवाय रुग्णांचे उपचार होणार नाही व औषधेही मिळणार नसल्याची घटना निदर्शनास आली असून आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टर नर्स व इतर कर्मचाऱ्यांचा अजब - गजब कारभार पहावयास मिळत असल्याने गावातील वयोवृद्ध स्त्रीया पुरुष लहान बालके व इतर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर टांगला जात आहे

गावातील आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातून गरोदर माता किरकोळ आजारावरील उपचार लहान बालकांचे औषधोपचार व इतर अनेक आजारांवरील उपचार केले जातात मात्र कोंढाळा आरोग्य उपकेंद्रामध्ये ३ ऑक्टोंबर २०२२ रोजी व यापूर्वी गावातील काही नागरिक उपचारासाठी गेले असता नागरिकांना उपचार न करता व कोणत्याही प्रकारची औषधे न देता घरी परतावे लागले आहे उपचार न होता घरी परतण्याचे कारण काय? तर अगोदर कोरोना लस घ्या यानंतरच उपचार केले जाईल व औषधेही दिले जाईल असे उपकेंद्रातील डॉक्टर नर्स व इतर कर्मचाऱ्यांचे म्हणणे असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. खरे म्हणजे सर्वप्रथम आरोग्य उपकेंद्रात आलेल्या रुग्णाची तपासणी करून उपचार करणे व औषधे देणे आवश्यक आहे मात्र याठिकाणी वेगळीच परिस्थिती पहावयास मिळत आहे कोरोना लस घेणे अनिवार्य नसून ऐच्छिक आहे. कोंढाळा येथील एका स्त्रीने ज्वराने फणफणत असलेल्या आपल्या लहान मुलीला आरोग्य उपकेंद्रामध्ये उपचारासाठी आणले असता त्या स्त्रीला अगोदर लस घ्या नंतरच उपचार होणार असल्याचे सांगितल्या गेले व परत पाठविले अशा अनेक म्हाताऱ्या स्त्रियांना लस न घेतल्याने घरी परतावे लागले आहे सदर घटनेबद्दल सुपरफास्ट न्यूजचे उपसंपादक यांनी कोंढाळा आरोग्य उपकेंद्रातील डॉ. कुथे यांना विचारणा केली असता आम्हाला वरिष्ठांनी निर्देश दिले असल्याचे सांगितले पत्र वा आदेश दाखवा म्हटले असता तसे कुठल्याही प्रकारचे पत्र वा आदेशही नसल्याचे कुथे यांनी म्हटले एखादी व्यक्ती लसच घेत नसेल तर त्यामध्ये छोटी मुले वा त्या कुटुंबातील सदस्यांचा दोष काय? यास जबाबदार कोण? लस घेणे अनिवार्य नसल्याने अगोदर रुग्णांची तपासणी करून उपचार करा व औषधे द्या अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos