गडचिरोली - चामोर्शी मार्गासह अनेक महत्वाचे मार्ग बंद, देसाईगंज तालुक्यात १०० जणांना काढले सुखरूप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
संपूर्ण जिल्हाभर पावसाने हाहाकार माजविला असून गडचिरोली - चामोर्शी, गडचिरोली - आरमोरी, वैरागड - धानोरा, देसाईगंज - कुरखेडा, आरमोरी - देसाईगंज सह अनेक महत्वाचे मार्ग बंद पडले आहे.
देसाईगंज तालुक्यात विक्रमी पाउस झाला असून तालुक्यात पुरामुळे अडकलेल्या १०० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथे २५ जणांना आरमोरी पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले आहे. जिल्ह्यात अनेक गावे पुरामुळे संपर्काबाहेर आहेत. प्रशासनाच्या वतीने नागरीकांना बाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. 
भामरागड तालुकासुध्दा मागील दोन दिवसांपासून संपर्काबाहेर आहे. तालुक्यातील १०० गावांचा कुठलाही संपर्क नाही. आलापल्ली - भामरागड, आलापल्ली - सिरोंचा मार्ग बंद आहे. कमलापूर - रेपनपल्ली मार्गावरील पुल खल्यामुळे या परिसरातील गावेसुध्दा संपर्काबाहेर आहेत. 

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-06


Related Photos