आयटीआय च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  शासकीय व खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता १० वीच्या फेर परिक्षेचा निकाल गेल्या ३० ऑगस्टला घोषित करण्यात आलेला असून यात उत्तीर्ण विद्यार्थी यापूर्वी अर्ज न भरु शकणारे विद्यार्थी तसेच यापुर्वी प्रवेश अर्ज भरल्यानंतरही प्रवेश मिळालेला नाही असे विद्यार्थी पुन्हा ऑनलाईन अर्ज भरु शकतात.
जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावरील आयटीआय मध्ये तसेच जिल्हास्तरीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश दिले जाणार आहे. सर्व आयटीआय मध्ये अर्ज स्विकृती केंद्र असून या केंद्रावर विद्यार्थी माहिती प्राप्त करु शकतील. तसेच ऑन लाईन अर्ज भरणे, पडताळणी, स्विकृती निश्चित करु शकतील. माध्यमिक शाळेत व्यवसाय शिक्षण हा विषय घेवून १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के आरक्षण ठेवण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांनी ऑन लाईन प्रवेश अर्ज http:admission.dvet.gov.in भरावा. ऑन लाईन अर्ज करुन संस्थेत जमा करण्याची अंतीम तारीख ११ सप्टेंबर असून गुणवत्ता यादी संकेत स्थळावर १२ सप्टेंबरला प्रसिद्ध होईल आणि संस्था स्तरावर गुणवत्ता यादी १३  सप्टेंबरला प्रसिद्ध होवून प्रवेश प्रक्रिया १४ सप्टेंबरला करण्यात येईल. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्ज शुल्क रु. १५० असून राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी रु.१०० आणि राज्याबाहेरील विद्यार्थ्यांसाठी रु.३०० ठेवण्यात आलेले आहे. विद्यार्थी वर्गानी याचा अवश्य लाभ घ्यावा, असे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, गडचिरोली तथा औद्योगिक संस्थेचे प्रभारी प्राचार्य अनंत सोमकुवर यांनी कळविले आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-06


Related Photos