आरमोरी तालुक्यात पावसाचा कहर , गडचिरोली - आरमोरी महामार्ग पुरामुळे बंद


 - तालुक्यातील सर्वच तलाव ओव्हरफ्लो, अनेकांच्या घराची पडझड 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : 
तालुक्यात आज ६ सप्टेंबरच्या पहाटे चार वाजताच्या सुमारास  विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊसाने कहर केला असुन तालुक्यातील जवळपास सर्वच तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत तर मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. आरमोरी तालुक्यातुन वाहणाऱ्या गाढवी नदीला पूर आला आहे यामुळे ठाणेगाव जवळ रस्त्यावर ३ ते ४ फुट पाणी आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद आहे. . 
 पावसामुळे  अनेकांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतशिवारांना अक्षरशः पुराचे स्वरूप प्राप्त झाले असुन यामुळे धान पिक मोठ्या प्रमाणात पाण्याखाली आले आहे.  दरम्यान विजांच्या कडकडाटाने थैमान घातल्याने पहाटेच्या सुमारास घरात झोपुन असलेल्यांची चांगलीच झोप उडवली . मात्र अद्यापतरी कुठेही अनुचित घटना घडल्याची नोंद झाली नाही. 
 अनेक ठिकाणी ओव्हरफ्लो झाल्याने पाणी अक्षरशः रस्त्यावरून  ओसांडुन वाहात आहे. यामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन पावसाळ्यात अनेक गोरगरीबांच्या घरांची पडझड झाल्याने अनेकांच्या निवाऱ्याचा  गंभीर प्रश्न निर्माण झाला असुन शेतशिवारही चांगलेच प्रभावीत झाले आहेत.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-06


Related Photos