खड्डा बुजविण्यासाठी दगडाचा वापर, अपघाताची शक्यता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
सध्या खड्ड्यांमुळे शहरातील रस्ते दिसेनासे झाले आहेत. खड्डेमय रस्त्यांवरून वाहन चालविताना वाहनधारकांची चांगलीच दमछाक होत आहे. अशातच आरमोरी मार्गावर पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या एका खड्ड्यात भल्लामोठा दगड टाकण्यात आल्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता बळावली आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये टाकण्यात आलेला मुरूम किंवा बारीक गिट्टीसुध्दा उखडून जात आहे. खड्ड्यांचा आकार दररोज मोठा होत आहे. यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. पावसाचाही जोर कायम असल्यामुळे खड्ड्यांमध्ये सारखे पाणी भरून राहत आहे. यामुळे कोणता खड्डा किती खोल आहे याचाही अंदाज लागत नाही. आरमोरी मार्गावरील खड्ड्यात कुणीतरी खड्ड्याच्या खोलीचा अंदाज यावा याकरीता दगड टाकला असावा. मात्र हा दगड अपघातास कारणीभूत ठरू नये, यामुळे खड्ड्यांमध्ये दगडाऐवजी मुरूम किंवा बारीक गिट्टी टाकावी, अशी मागणी होत आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-06


Related Photos