गोसेखूर्द धरणातून ७२८७ क्युसेक पाण्याचा विसर्ग, गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
गोसेखूर्द धरणाचे ३३ दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले आहे. या मधून ७२८७ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून वैनगंगा नदीला पूर आला आहे. वैनगंगा नदीच्या उपनद्या तसेच नाल्यांना दाब निर्माण झाला असून जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद पडले आहेत.
जिल्ह्यातील कुरखेडा - वैरागड  - रांगी, अहेरी - देवलमरी, आलापल्ली - भामरागड, कमलापूर - रेपनपल्ली, आरमोरी - वडसा, शंकरपूर - बोडधा, फरी - किन्हाळा, एटापल्ली - आलापल्ली, अहेरी - सिरोंचा, भामरागड - लाहेरी, चातगाव - पेंढरी, मानापूर - पिसेवडधा, हळदी - डोंगरगाव, कोरची - घोटेकसा, धानोरा - मालेवाडा, चोप - कोरेगाव आदी मार्ग बंद आहेत.
वैरागड गावाला पुराने वेढले आहे. वैरागड येथील अनेक नागरीकांची घरे पडली आहेत. जिल्ह्यातील हजारो गावे संपर्काबाहेर असून नागरीकांचे प्रचंड हाल होत आहे. अजून दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नागरीकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-06


Related Photos