महत्वाच्या बातम्या

 रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / वरोरा : वरोरा महामार्ग पोलीस च्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानाचा प्रारंभ ३१ जानेवारी रोजी करण्यात आला. रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्य वाहन चालक युवक युवती यांना वाहन चालवताना कोणती काळजी घेतली पाहिजे. 

याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वाहतूक नियमाचे उल्लंघन वाहन चालकांनी केल्यास त्याला होणारा दंड व न्यायालयीन शिक्षेमध्ये असलेली तरतूद याबाबत माहिती देण्यात आली. दुचाकी वाहन धारकांनी हेल्मेटचा वापर करीत मूळ दस्तऐवज सोबत ठेवावे चार चाकी वाहन धारकाने वाहनाच्या वेग नियंत्रण ठेवले पाहिजे सीट बेल्ट लावून वाहन चालवण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. 

सदर अभियान अप्पर पोलीस महासंचालक रवींद्र कुमार सिंगल पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके पोलीस निरीक्षक यवतमाळ आर एलदुबे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र खैरकर पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल मोरे पोलीस उपनिरीक्षक उमाकांत गौरकार व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपक्रम राबविला. 

यावेळी छत्रपती शिवाजी विद्यालय कोंठाचे संस्थापक रमेश पायपरे, मुख्याध्यापिका सरिता कुंभारे, सहाय्यक शिक्षक विधाते एडवोकेट, कुदरीकर विनोद खोब्रागडे, प्रवीण खिरटकर, लखन केशवानी तसेच छत्रपती शिवाजी विद्यालय कोंठाचे उपस्थित होते. 

३० कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण राज्य महामार्ग पोलीस विभागात कार्यरत ३० कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण झाले असून त्यांच्या जागेवर नवीन कर्मचारी रुजू होणार आहे. यामध्ये प्रथमच राज्य महामार्ग पोलीस विभागात महिला कर्मचारी रुजू होणार आहे. 





  Print






News - Chandrapur




Related Photos