भामरागडचा संपर्क तुटलेलाच , पर्लकोटा नदीच्या पुलावर ४ ते ५ फुट पाणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : 
पर्लकोटा नदीच्या पुलावरून ४ ते ५ फुट पाणी असल्यामुळे भामरागड - आलापल्ली मार्ग बंदच  आहे. पाण्याची पातळी वाढतच असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 
काही सखल भागातील नागरीकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. तर काही नागरीकांच्या घराभोवती पाणी असल्यामुळे त्यांना जिवनावश्यक वस्तूंसाठी नावेचा आधार घ्यावा लागत आहे. पिण्याचे पाणीसुध्दा बाहेरून नावेच्या सहाय्याने आणावे लागत आहे.  

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-06


Related Photos