पी. चिदंबरम यांची १९ सप्टेंबरपर्यंत तिहार तुरुंगात रवानगी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना तिहार तुरुंगात जावं लागणार आहे. दिल्लीतील राऊज ॲव्हेन्यू कोर्टाने चिदम्बरम यांना १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावलीय. यामुळे चिदंबरम यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात येणार आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणात गैरव्यवहार केल्याचा चिदंबरम यांच्यावर आरोप आहे.
पी. चिदंबरम हे सीबीआयच्या कोठडीत होते. दोन दिवसांच्या सीबीआय कोठडीनंतर त्यांना आज दिल्लीतील कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी सुनावणीत चिदंबरम यांना न्यायालयीन कोठडीची मागणी सीबीआयने केली. तर चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी सीबीआयच्या या मागणीला विरोध केला. यामुळे कोर्टाने आपला निर्णय काही कालावधीसाठी राखून ठेवला होता. यानंतर पुन्हा झालेल्या सुनावणीत कोर्टाने चिदंबरम यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. तुरुंगात चिदंबरम यांना झेड दर्जाची सुरक्षा पुवरण्यात येणार आहे. तसंच त्यांना वेगळ्या कोठडीत ठेवण्यात येणार आहे.  Print


News - World | Posted : 2019-09-05


Related Photos