गडचिरोली जिल्हयातील सर्व शाळा व महाविद्यालयांना ६ व ७ सप्टेंबर रोजी सुट्टी घोषित : जिल्हयात अतिवृष्टीचा इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
प्रादेशिक हवामान अंदाज केंद्र,नागपूर यांनी ५ ते ८ सप्टेंबर या कालावधीत गडचिरोली जिल्हयातील तुरळक भागात अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. मान्सून काळातील पूर्वानुभाव लक्षात घेता गडचिरोली जिल्हयात सातत्याने होणारी अतिवृष्टी विशेषत काही भागामध्ये कमी वेळात अधिक पाऊस पडल्याचे दिसून येते. अतिवृष्टीमुळे जिल्हयात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपातकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी यांचेवर होऊ नये या करीता गडचिरोली जिल्हयातील सर्व तालुक्यातील शाळा / विद्यालयांना दिनांक ६ सप्टेंबर २०१९ ते ७ सप्टेंबर २०१९ पर्यत सुट्टी घोषीत करण्यात आली आहे. 
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपती व्यस्थापन प्राधिकरण गडचिरोली, आपत्ती व्यवस्थापन अधिनयम २००५  व संदर्भ क्रं. २ चे परिपत्रकातील परिच्छेद क्रं.२नुसार शासनाने प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन, गडचिरोली जिल्हयातील सर्व तालुक्यातील सर्व शाळांना (अंगणवाडी,प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक व महाविद्यालय) ६ सप्टेंबर व ७ सप्टेंबर २०१९  रोजी सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. 
वरील कालावधीत नागरिकांनी उचित काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. नदी व नाल्या शेजारील गावांनी व राहणाऱ्या  लोकांनी सतर्क रहावे. पुलांवरून पावसाचे पाणी वाहत असताना कृपया पुल ओलांडू नये. अतिवृष्टी काळात वाहणे चालविताना आवश्यक काळजी घ्यावी. तसेच शेतकऱ्यांनी शेतात कामे करण्यास जाताना खबरदारी बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-05


Related Photos