विनोद अग्रवाल यांच्या हस्ते १ कोटी ८० लाख रुपयांच्या विविध विकासकार्याचे भूमिपूजन संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया :
२५/१५ तसेच विविध योजने अंतर्गत मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य  विनोद अग्रवाल यांच्या हस्ते पार पडले. ग्राम मुंडीपार येथे ३ लाख रुपये, ग्राम नवरगाव कला येथे ६ लाख रुपये, ग्राम गुदमा येथे १६ लाख रुपये मंजूर करण्यात आलेले असून ८ लाख रुपये सिमेंट रस्ता, ५ लाख रुपये छत्रपती शिवाजी महाराज मंच, २ लाख रुपये बौद्ध विहार सौंदर्यीकरण व १ लाख रुपये हनुमान मंदिर सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. ग्राम फुलचूर (आंबाटोली) येथे २५ लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. ग्राम सायटोला रतनारा येथे १० लाख रुपये मंजूर झाले असून सिमेंट रस्ता बांधण्यात येणार आहे. ग्राम कोरनी येथे ५ लाख  रुपये मंजूर झाले आहेत तसेच ग्राम भाद्याटोला येथे ५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. ग्राम बिरसोला येथे ८ लाख रुपये मंजूर झाले असून सिमेंट रस्ता बांधकाम त्यातून करण्यात येईल.  ग्राम छीपिया येथे १२ लाख रुपये मंजूर झाले असून वार्ड क्रमांक २ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, ५ लाख रुपये पांधन रस्ता खडीकरण व ५ लाख रुपये सिमेंट रस्ता बांधकामासाठी देण्यात येणार आहे. ग्राम पांजरा येथे विविध कामांसाठी १२ लाख रुपये मंजूर झाले आहेत ज्यात साहेबलाल अटरे यांच्या घरापासून ते  सुबराम कापसे यांच्या घरापर्यंत रस्ता  दुरुस्ती तसेच चैनलाल लिल्हारे यांच्या घरापासून ते हरिचंद मानकर यांच्या घरापर्यंत रस्ता दुरुस्ती,  मुक्ता बाई धुरे ते रामप्रसाद लिल्हारे यांच्या घरापर्यंत रस्ता बांधकाम व  बाघ देव चौक येथे चावड़ी बांधकाम करण्यात येणार आहे. दलित वस्ती निधी अंतर्गत ग्राम अंभोरा येथे  भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे पालक मंत्री तथा आदिवासी विकास व वन राज्य मंत्री डॉ परिणय जी फुके यांच्या निधीतून ६ लाख रुपये मंजूर झाले असून आंबेडकर चौकात ३ लाख रुपये बौद्ध विहाराची चावडी निर्मिती साठी देण्यात येणार आहे. तसेच ३ लाख रुपये वार्ड क्रमांक ३ येथे बौद्ध चौक बौद्ध विहार चावडी साठी देण्यात येणार आहेत. ग्राम लोधीटोला येथे ४ लाख रुपये मंजूर झाले असून भगवान विष्णू मंदिराची चावडी चे बांधकाम करण्यात येणार आहे. ग्राम पिंडकेपार येथे २५ लाख रुपये देण्यात आलेले असून त्यात विविध विकासकार्य केले जाणार आहेत. ग्राम नागरा येथे २४ लाख ५० हजार रुपये मंजूर झाले असून नागरा ते कटँगी पर्यंत रस्ता खडीकरण (जिल्हा निधी अंतर्गत) ८ लाख रुपये,  कटंगटोला वार्ड क्र.१ मधे सीमेंट रस्ता  ३ लाख रुपये, चाँदनीटोला वार्ड क्र.२ मधे सीमेंट रस्ता  २.५ लाख रुपये, मोहरान टोली वार्ड क्र. ३ येथे सीमेंट रस्ता ३ लाख रुपये, मोहरान टोली वार्ड क्र. ३ येथे सीमेंट रस्ता ३ लाख रुपये, खररिटोला वार्ड क्र. ५ येथे सीमेंट रस्ता २.५ लाख रूपये, नागराटोली वार्ड क्र.५ येथे सीमेंट रस्ता २.५ लाख रूपये साठी देण्यात येणार आहेत. ग्राम जब्बारटोला येथे २० लाख रुपये मंजूर करण्यात आलेले असून विविध विकास कामे त्यातून केली जाणार आहेत. 
या वेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा शहर पदाधिकारी तसेच संबंधित गावांचे सरपंच व उपसरपंच, ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य व समस्त भारतीय जनता पक्ष, युवा मोर्चा, महिला मोर्चा व सर्व अंगीकृत आघाडीचे कार्यकर्ते आणि समस्त गावकरी बांधव उपस्थित होते. 
  Print


News - Gondia | Posted : 2019-09-05


Related Photos