महत्वाच्या बातम्या

 भद्रावती येथील रोजगार मेळाव्यात १९६ उमेदवारांची निवड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : भद्रावती येथे २९ जानेवारी रोजी आयोजित पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात १९६ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडल करिअर सेंटर व श्री साई आय.टी.आय. भ्रदावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रोजगार मेळाव्यात जय महाराष्ट्र प्लेसमेंट सर्व्हिसेस चंद्रपूर, व्हि-१ क्लिक सोलुशन, स्वातंत्र्य फायनान्स बल्लारपूर, एस.बी.आय. लाइफ इन्शुरन्स, नवभारत फर्टिलायझर नागपूर, भारत पेट्रोलियम, नवकिसान बायोटेक नागपूर, संसूर सृष्टी, स्टार युनियन लाइफ इन्शुरन्स, श्रीराम लाईफ आदी कंपन्या सहभागी होत्या. या रोजगार मेळाव्यात ८५० उमेदवार सहभागी झाले होते, त्यापैकी १९६ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

रोजगार मेळाव्याला जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य भालचंद्र रासेकर, साई इंजिनिअरीग कॉलेजचे प्राचार्य डॉ. विनोद गोरंटीवार तसेच सर्वश्री अमित गुंडावार, रविंद्र शिंदे, अमित पत्तीवार, करूणा पत्तीवार, राजेश नगराळे, आदींची उपस्थिती होती.





  Print






News - Chandrapur




Related Photos