भामरागडमध्ये शिरले पुराचे पाणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड
: यावर्षी भामरागडला तब्बल सहाव्यांदा पुराचा फटका बसला असून कालपासून आलेल्या पुराचे पाणी भामरागडमध्ये शिरले आहे. काही नागरीकांच्या घरांमध्ये तसेच दुकानांमध्ये पाणी साचले आहे. पर्लकोटा नदीच्या पुलावरून ४ ते ५ फुट पाणी असल्यामुळे भामरागड - आलापल्ली मार्ग बंद आहे.
काही सखल भागातील नागरीकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. तर काही नागरीकांच्या घराभोवती पाणी असल्यामुळे त्यांना जिवनावश्यक वस्तूंसाठी नावेचा आधार घ्यावा लागत आहे. पिण्याचे पाणीसुध्दा बाहेरून नावेच्या सहाय्याने आणावे लागत आहे. विशेष म्हणजे आज भामरागड येथे आठवडी बाजार असतो. मात्र पुरामुळे भाजीपाला तसेच इतर विक्रेते पोहचू शकले नाहीत. यामुळे आठवडी बाजाराला सुध्दा फटका बसला आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-04


Related Photos