महत्वाच्या बातम्या

 उप पोलीस स्टेशन लाहेरी येथे कायदेविषयक मेळाव्याचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / भामरागड : सर्वसामान्य नागरिकांना कायद्याचे ज्ञान मिळून त्यांना कायद्याप्रती जागृती निर्माण करण्यासाठी तसेच त्यांचे हक्क व कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व गडचिरोली पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमानाने उप पोलीस स्टेशन लाहेरी येथे कायदेविषयक जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांना व विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कायद्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष उप पोलीस स्टेशन लाहेरीचे प्रभारी अधिकारी महादेव भालेराव व प्रमुख पाहुणे सीआरपीएफ 37 बटालियनचे असिस्टंट कमांडर स्वागत सर लहरीचे ग्रामसेवक गोरे साहेब तसेच आश्रम शाळा लाहेरी चे मुख्याध्यापक बकर सर यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मेळाव्याचे सुरुवात केली.

उप पोलीस स्टेशन लहरीचे प्रभारी अधिकारी महादेव भालेराव यांनी उपस्थितांना वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांंना त्यांच्या दैनंदिन जीवनात तसेच पुढील वाटचालीमध्ये कायद्याचा उपयोग कसा घ्यावा व स्वतःचा बचाव कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले तसेच पोलीस उपनिरीक्षक प्रशांत डगवार यांनी अंधश्रद्धा निर्मूलन या कायद्याबाबत माहिती देऊन लाहेरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व जनतेला व विद्यार्थ्यांना कायद्याचे उपयोग करून पोलिसांना सहकार्य करण्याबाबत विनंती करण्यात आली. तसेच मपोशी वृषाली चव्हाण यांनी पोक्सो कायदा याबाबत माहिती देऊन उपस्थित विद्यार्थिनी यांना गुड टच, बॅड टच बद्दल माहिती दिली.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक प्रशांत डगवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रभारी अधिकारी महादेव भालेराव यांनी केले.

सदर मेळाव्याच्या यशस्वीते करिता पोलीस स्टेशन लहरीचे अंमलदार व एस आर पी एफ ग्रुप 10 सोलापूर चे पोलीस उपनिरीक्षक पाटील व अंमलदार तसेच सीआरपीएफ बटालियन 37 चे अधिकारी व अंमलदार यांनी प्रयत्न केले. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos