अतिवृष्टीमुळे गडचिरोली न.प. ची सर्वसाधारण सभा रद्द, नगर परिषद जलमय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
आज ४ सप्टेंबर रोजी सकाळपासूनच झालेल्या अतिवृष्टीमुळे नगर परिषदेच्या आवारात तसेच विविध कक्षांमध्ये पाणी शिरल्यामुळे आज आयोजित सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा योगिताताई प्रमोद पिपरे यांनी दिली आहे.
नगर परिषदेची रद्द करण्यात आलेली सभा तीन दिवसानंतर घेण्यात येणार असल्याचेही नगराध्यक्षा योगिताताई पिपरे यांनी सांगितले आहे. नगर परिषदेच्या आवारात तसेच अनेक कक्षांमध्ये पाणी शिरल्यामुळे कार्यालयीन कामकाज ठप्प पडले आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-04


Related Photos