महत्वाच्या बातम्या

 ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांचे आधार नोंदणी करा : जिल्हाधिकाऱ्याचे आधार सनियंत्रण आढावा बैठकीत निर्देश


 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : जिल्ह्यातील ० ते ५ वर्ष वयोगटातील मुलांचे आधार नोंदणी प्राधान्याने करा. जन्मतःच बालकांचे आधार नोंदणी होण्यासाठी शासकीय तसेच खाजगी रुग्णालयाच्या आरोग्य यंत्रणेने पोस्ट विभागात असलेल्या आधार केंद्राच्या सहकार्याने आधार नोंदणी प्राधान्याने करावी, असे निर्देश संबंधित विभागांना जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी दिले.
नि. लेफ्टनंट कर्नल अक्षय यादव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा प्रशासन अधिकारी अतुल पंत, आरोग्य व जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मुलांच्या जन्माची नोंद जन्मतःच होणे गरेजेचे आहे. विविध शासकीय कार्यालयामध्ये तसेच शिक्षणासाठी आधार कार्डची गरज पडते. ऐनवेळी अडचण होऊ नये यासाठी आधार कार्ड काढून घ्यावे. सर्वच नागरिकांनाही आपला आधार क्रमांक अपडेट करणे गरजेचे आहे. जेणेकरून त्यांना पुढे अडचण येणार नसल्याचे जिल्हाधिकारी पुढे म्हणाले.





  Print






News - Nagpur




Related Photos