७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : 
मेट्रो रेल्वेच्या लोकमान्यनगर ते सीताबर्डी या मार्गाच्या लोकार्पणासह इतर कार्यक्रमांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ सप्टेंबर रोजी नागपुरात येत आहेत.  सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटे ते ७ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते शहरात उपस्थित असतील. 
पंतप्रधान मोदी सायंकाळी ४ वाजून १० मिनिटांनी औरंगाबाद येथून नागपूरकडे प्रस्थान करतील. सायंकाळी ५.०५ मिनिटांनी ते नागपूर विमानतळा‌वर पोहोचतील. ५ वाजून १० मिनिटांनी ते विमानतळावरून सुभाषनगर मेट्रो स्टेशनकडे प्रयाण करतील. येथील कार्यक्रम आटोपून ते सुभाषनगर येथून मेट्रोने प्रवास करतील. सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटे ते ६ वाजताच्या सुमारास ते कस्तूरचंद पार्ककडे प्रस्थान करतील. तेथे ते एम्सच्या ओपीडीचे आणि चंद्रपुरातील सैनिक स्कूल इमारतीचे उद्घाटन करतील. त्यानंतर ते 'नॅशनल लेव्हल पेन्शन स्किम फॉर ट्रेडर्स अँड  शॉपकिपर' या निवृत्तीवेतन योजनेचे लोकार्पण करतील. ७ वाजून ५ मिनिटांनी पुन्हा विमानतळाकडे प्रस्थान करतील. ७ वाजून २५ मिनिटांच्या आसपास ते विमानतळावर पोहोचतील. पुढील पाच मिनिटांत ते वायुसेनेच्या विमानाने नवी दिल्लीकडे प्रस्थान करतील. सध्या नागपुरात दमदार पाऊस कोसळत असल्याने कस्तूरचंद पार्कवरील सभा रद्द होऊन ती मानकापूर स्टेडियम येथे आयोजित करण्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.    Print


News - Nagpur | Posted : 2019-09-04


Related Photos