महत्वाच्या बातम्या

 जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र अत्याधुनिक करणार : जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : जिल्ह्यातील ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम सुरु आहेत ते दर्जात्मक असावे. बांधकामामध्ये सौर उर्जा, फर्निचर, शौचालय, पिण्याच्या पाण्याच्या सोयी सह रुणासांठी शेड आदींची सुधारित प्रस्तावात समावेश करावा. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र अत्याधुनिक करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

आरोग्य विभागाच्या सुकाणू समिती, प्रधानमंत्री मातृवंदना योजना व जिल्हा कृती दलाच्या आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, भारतीय प्रशासकीय सेवेचे परिवीक्षाधिन अधिकारी कुशल जैन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोगय अधिकारी डॉ. अजय डवले, जिल्हा माता संगोपन अधिकारी रेवती साबळे, डॉ. आसिफ इनामदार तसेच संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकाम व इतर सोयी सुविधांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ६० कोटीचा निधी देण्यात येणार असून बांधकामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही,असे  जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

सुधारित प्रस्ताव तयार करतांना जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांना आवश्यक असलेल्या बाबींची नोंद घ्यावी. आरोग्य विभागांची सर्व पदे भरण्यात येईल. त्यामुळे ग्रामीण आरोग्य यंत्रणा सक्षम होऊन नागरिकांना त्यांचा लाभ घेता येईल, असेही ते म्हणाले.

यावेळी प्रधानमंत्री मातृवंदना योजना, जंतनाशक दिन आदी विषयांचा आढावा घेण्यात आला.





  Print






News - Nagpur




Related Photos