महत्वाच्या बातम्या

 गोंडवाना सैनिकी विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालयात आज ३० जानेवारी रोजी जगाला अहिंसा, शांतता, सत्य या मूल्यांचा वसा देणारे बापूजी म्हणजेच महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीदिनानिमित्य त्यांना गोंडवाना सैनिकी विद्यालय तर्फे अभिवादन करण्यात आले. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष संजीव गोसावी, प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. राकेश चडगुलवार, देवेंद्र म्हशाखेत्री, प्रेमसुधा मडावी, शंकर दासरवार यांच्या हस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले व श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संजीव गोसावी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ते म्हणाले कि, महात्मा गांधीजींनी देशाला स्वतंत्र मिळवून देण्याकरिता स्वतःला समर्पित केले होते. पण कधीही त्यांनि हिंसेचा मार्ग पत्करला नव्हता, ते नेहमी सत्याच्याच मार्गावर चालत व इतरानाही त्याप्रमाणे चालायला सांगत असत. त्या करीता त्यांनी अनेक आंदोलने केली त्यांचे देशसेवेचे कार्य चालू असतांनाच, ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधींची गोळ्या झाडून हत्या केली होती. गांधीजींच्या या बलिदानाच्या स्मरणार्थ दरवर्षी ३० जानेवारी हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. आजचा दिवस त्यांच्या आदर्शांच्या स्मरणाचा दिवस आहे. ज्यामुळे त्यांनी शस्त्र न उचलता इंग्रजांना भारतातून हाकलून दिले. त्यांचे विचार हे त्याची तलवार आणि ढाल दोन्ही होते. महात्मा गांधींची जीवनकथा, सत्याचा संदेश, अहिंसा आणि प्रेमाने देशातीलच नव्हे तर परदेशातही अनेकांना प्रेरणा दिली. महात्मा गांधींनी आपल्याला जे सत्य, शांतता व अहिंसेचे मार्ग दाखविले आहे. त्यांच्या मार्गावरून चालणे आज गरजेचे आहे, असे मत त्यांनी मांडले. 

प्रसंगी प्रा.डॉ. राकेश चडगुलवार यांनीही यावेळी गांधीजींच्या जीवनातील प्रसंग सांगून मार्गदर्शन केले ते म्हणाले कि, शहीद दिन आपल्याला महात्मा गांधींच्या विचारांची आठवण करून देतो. त्यांचे विचार आजही राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवतात, जगाला अहिंसा, शांतता व सत्य या मूल्यांचा वसा देणारे बापूजी यांनी ३० जानेवारी १९४८ दिवशी जगाचा निरोप घेतला. महात्मे कधीच मरत नसतात ते त्यांच्या कृतीतून व कार्यातून नेहमीच अजरामर असतात म्हणूनच आजच्या दिवशी त्यांच्या विचारांचे आत्मसात करणे व त्यांना अंगीकारणे  हेही तेवढेच महत्वाचे आहे. असे ते म्हणाले. 

कार्यक्रमाचे संचालन हर्ष उके यांनी तर आभार श्रीहर्ष यांनी केले. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos