पर्लकोटाच्या पुलावर चढले पाणी, भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा भामरागड तालुक्याला जगापासून दूर व्हावे लागले आहे. पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे तालुक्याचा जगाशी संपर्क तुटला आहे.
मागील महिन्यात तब्बल ३ ते ४ वेळा भामरागडला पुराचा फटका बसला होता. अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. तसेच अनेक दिवस नागरीकांच्या घरांमध्ये पाणी शिरून राहिले होते. आज ३ सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा भामरागडमध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिस आणि महसूल विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अजून दोन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला असून संततधार पाउस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यात इतरही भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
News - Gadchiroli | Posted : 2019-09-03