हिंगणघाट येथे गौरी विसर्जनादरम्यान तोल जाऊन दोन महिला , दोन बालके नदीत बुडाले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा
: जिल्ह्यातील  हिंगणघाट येथे वना नदीत हरतालिका विसर्जन करताना तोल जाऊन दोन महिलांसह चारजण  बुडाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. बुडालेल्यांपैकी एका महिलेचा मृत्यू झाला असून तीन जणांचा  शोध सुरु असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदर घटना आज २ सप्टेंबर रोजी दुपारी घडली.  
 वणा नदीत हरतालिका  विसर्जन करताना दोन महिला आणि दोन लहानग्यांचा तोल गेल्याने हे चौघेही नदीत बुडाले. त्यामुळे नदीवर आलेल्या इतर महिलांनी जोरजोरात आरडाओरड करण्यास सुरुवात केली. काही लोकांनी पोलिसांना तात्काळ घटनास्थळी बोलवल्यानंतर नदीत बुडालेल्या चौघांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी एका महिलेचा मृतदेह नदीतून काढण्यात पोलिसांना यशही आले. मात्र आणखी एक महिला आणि दोन लहानग्यांचा अद्याप शोध लागलेला नाही.दरम्यान, नदीत चारजण बुडाल्याची माहिती मिळताच स्थानिक आमदारानेही घटनास्थळी धाव घेतली . 



  Print






News - Wardha | Posted : 2019-09-02






Related Photos