महत्वाच्या बातम्या

 यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महिला स्नेहमिलन व हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीने महिला स्नेहमिलन व हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी महिलांना हळदी कुंकु लावत वाण वाटप केले.

 या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज महिला शहर प्रमुख सविता दंढारे, सायली येरणे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, आशा देशमूख, विमल काटकर, स्मिता वैद्य, कौसर खान, वैशाली मेश्राम, अनिता झाडे, पौर्णिमा, अस्मिता दोनाडकर, सोनाली आंबेकर, माधूरी निवलकर, वंदना हजारे, अल्का मेश्राम, दुर्गा वैरागडे, माधूरी बावणे आदींची उपस्थिती होती.

यंग चांदा ब्रिगेड या संस्थेने कमी काळात समाजिक क्षेत्रात मोठे नाव केले आहे. समाजकारण याबरोबरच महिला सक्षमीकरणावर संस्थेचा भर राहिला आहे. या दिशेने संस्थेच्या वतीने महिलांसाठी विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान शणीवारी संस्थेच्या वतीने महिलासाठी स्नेहमिलन व हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित महिलांना वाण वाटप करुन तिळगूळ देण्यात आले. यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने दरवषी असे कार्यक्रम आयोजीत केल्या जाईल असे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सांगण्यात आले.





  Print






News - Chandrapur




Related Photos