ऑनलाइन प्रोफाइल तयार करणे शाळांना बंधनकारक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
  राज्यातील माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे नवे प्रोफाइल तयार करावे लागणार असून यासंदर्भातील माहिती शाळांना ऑनलाइन भरायची आहे. यासंदर्भात  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत  नागपूर विभागीय मंडळाचे सचिव रविकांत देशपांडे यांनी सर्व शाळांना पत्र पाठवून तसे आदेश दिले आहे.
राज्यातील मंडळाची संलग्न असलेल्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांची अद्ययावत माहिती दरवर्षी उपलब्ध होताना अडचणी येतात. अनेकदा जुनीच माहिती अपडेट केली जाते. त्यामुळे राज्य मंडळाने आता दहावी-बारावी शाळांचे नवे प्रोफाइल तयार केले जाणार आहे. शाळांनी सद्यस्थितीतील माहिती ऑनलाइन भरावयाच्या सूचना दिल्या आहेत. संपूर्ण सप्टेंबर महिन्यात हे काम केले जाणार आहे. त्यासाठी समितीही स्थापन करण्यात आली आहे.
राज्य मंडळाने या संदर्भात एक परिपत्रक काढले आहे. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची भौगोलिक माहिती गुगल मॅपवरून देण्यात यावी, अशी  सूचना केली आहे. यूडायस आयडी, ओटीपी, पासवर्ड यांसारख्या आधुनिक प्रणाली वापरल्यामुळे ही माहिती कायम स्वरूपी राहणार आहे. तसेच सविस्तर सूचनाही यामध्ये देण्यात आल्या आहेत. १ ते ३० सप्टेंबरदरम्यान मंडळातर्फेदरवर्षी फ्रेब्रुवारी व मार्च तसेच जुलै ते ऑगस्ट परीक्षांचे आयोजन केले जाते. या माध्यमातून मंडळाला कायमस्वरूपी माहिती प्राप्त होणार आहे. सदर प्रोफाइलमध्ये शाळा, शाळा प्रशासन, इमारती, विद्यार्थी संख्या, परीक्षा आसन व्यवस्था, शाळेने नियुक्त केलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या, नववी व दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांची संख्या, या माहितीबरोबरच शाळेतील मागील तीन वर्षांचा निकाल देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. परीक्षा मंडळाने नियुक्त केलेल्या परीक्षकांची व नियमांची माहिती व बँक डिटेल्स ही याद्वारे मंडळाकडे उपलब्ध होणार आहेत.  Print


News - Nagpur | Posted : 2019-09-02


Related Photos