महत्वाच्या बातम्या

 मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन


- रस्ते बांधकामासाठी कोट्यवधींची निधी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील मुख्य रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरणासह सुधारणा करण्यासाठी कोट्यवधींची निधी मंजूर झाले असून नुकतेच अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

यामध्ये बोटलाचेरू फाट्यापासून आलापल्लीकडे पुढे ४ किलोमीटरचे काम केले जाणार असून यासाठी १९९.३७ लक्ष रुपयांची निधी मंजूर झाली आहे. दुसरे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून नवेगाव ते आपापल्ली ते चिंतलपेठ ९.४० किलोमीटर पर्यंत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात येणार असून यासाठी तब्बल ५९०.०० लक्ष रुपयांची निधी मंजूर झाली आहे. तर याच परिसरात तिसरे काम ९७.८० लक्ष रुपयांच्या निधीतून नवेगाव ते किष्टापूर (१.७९ किलोमीटर) रस्त्याचे डांबरीकरण काम केले जाणार आहे. सर्व कामांचे टेंडर पूर्ण झाले असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.

कोट्यवधींच्या निधीतून नवेगाव, किष्टापूर आणि वेलगुर या तिन्ही गावातील मुख्य रस्ते गुळगुळीत होणार आहे. सदर रस्ते विकास कामामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केला असून भूमिपूजन निमित्य मंत्री धर्मराव बाबा परिसरात दाखल होताच गावातील नागरिकांनी मोठ्या जल्लोषात ढोल ताश्यांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत जंगी स्वागत केले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, किष्टापूरचे उपसरपंच पवन आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास वीरगोनवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष स्वप्नील श्रीरामवार, सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार, जेष्ठ नागरिक श्रीकांत मद्दीवार, मनीषा सडमेक, वेलगुर टोल्याचे, सडमेक महाराज ग्रा. सदस्य रोहित गलबले, जेष्ठ नागरिक राजेश्वर उत्तरवार, ग्रा.प. सदस्य वामन मडावी, आशण्णा दुधी, आदिल पठाण, अरविंद खोब्रागडे, बाबुराव सोनूले, आलापल्लीचे ग्रा.प. सदस्य मनोज बोल्लूवार, ग्रा.प. सदस्य पुष्पा अलोने, ग्रा.प. सदस्य सोमेश्वर रामटेके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी तसेच नवेगाव, किष्टापूर आणि वेलगुर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos