गडचिरोली जिल्ह्यात २०० गावांमध्ये ‘एक गाव - एक गणपती’


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : 
जिल्ह्यात उद्या २ सप्टेंबरपासून गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. पोलिस विभागाच्या वतीने पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनात एक गाव - एक गणपती उपक्रमाबाबत मार्गदर्शन करण्यात आले होते. यातून २००  गावांनी प्रेरणा घेत गावात एकच गणपती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यात ७५०  सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने गणपतीची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच २ हजार ६००  खाजगी गणपतींची स्थापना करण्यात येणार आहे. जिल्ह्यात खाजगी व सार्वजनिक असे एकूण ३ हजार २५०  ठिकाणी गणेशाची स्थापना होणार आहे. संपूर्ण गणेशोत्सवात ध्वनी प्रदुषण कायद्याचे उल्लंघन करणारांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच गणपती उत्सवानिमित्त जिल्हाभरात कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सर्वांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन करीत पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-01


Related Photos