शासकीय आदिवासी वसतिगृहातील व्यवस्था समाधानकारक : ना. डॉ. परिणय फुके


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली : 
राज्याचे सार्वजनिक बांधकाम, वने व आदिवासी विकास, राज्यमंत्री, डॉ. परिणय फुके यांनी गडचिरोली येथील शासकीय आदिवासी मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहाला भेट दिली. यावेळी त्यांनी वसतिगृहाच्या व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी इंदूराणी जाखड   व इतर मान्यवर उपस्थित होते.
राज्यमंत्री परीणय फुके यांनी मुलांच्या शासकीय आदिवासी वसतिगृहाला भेट देऊन तेथील अभ्यासिका तसेच संगणक कक्ष, ग्रंथालय याबाबत पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व व्यवस्थेबाबत विचारपूस केली. त्यानंतर राज्यमंत्री यांनी मुलींच्या शासकीय आदिवासी वसतिगृहाला भेट दिली. त्या ठिकाणी डीबीटीबाबत मुलींशी चर्चा केली, त्यांची राहण्याची व्यवस्था आणि त्याठिकाणी अस्तित्वात असलेले २००० पुस्तकांचे नव्याने तयार केलेले ग्रंथालय़ालाही भेट दिली. गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठे हे मुलींचे आदिवासी वस्तीगृह आहे याठिकाणी ३२० मुलींसाठी राहण्याची व्यवस्था होईल एवढी प्रशस्त इमारत असून मुलींना राहण्यासाठी चांगल्या प्रकारे शासनाकडून त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यमंत्र्यांनी यावेळी इंदुराणी जाखड प्रकल्पाधिकारी यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.
शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील सहाय्यक प्रकल्प अधिकारी वंदना महल्ले, अनिल सोमनकर यांनी मंत्र्यांना वसतिगृहाबद्दल सविस्तर माहिती दिली. गृहपाल स्वाती पांडे यांनी  आधुनिक ग्रंथालयाबाबत राज्यमंत्र्यांना माहिती दिली. तसेच मुलांच्या वसतिगृबाबत अधीक्षक रविंद्र गजभिये यांनी माहिती दिली. यावेळी गृहपाल मुकेश गेडाम यांनी सहकार्य केले. डॉ. परणीय फुके राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम वने व आदिवासी विकास यांनी या दौऱ्या वेळी सेमना येथील हनुमान मंदिराला भेट दिली.
 
गडचिरोली जिल्ह्यामध्ये इंदूराणी जाखड यांच्या खर्रा मुक्त अभियानाचे कौतुक राज्यमंत्री परिणय फुके यांनी यावेळी केले. दोन्ही वसतिगृहातील स्वच्छता चांगल्याप्रकारे आढळून आल्यानंतर यावेळी माहिती देताना खर्रा मुक्त अभियानाबाबत मंत्र्यांना इंदुराणी जाखड यांनी माहिती दिली. यावेळी अभियान यशस्वी झाल्याबाबत मंत्र्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी विविध कार्यालयात तंबाखू व दारूमुक्त अभियानाबाबत नुकतेच विविध जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यासाठी लेखी सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार खर्रा मुक्त अभियान चांगल्या प्रकारे राबविण्यात येत असल्याचे जाखड यांनी यावेळी सांगितले.


 गडचिरोली जिल्ह्यातील मुलांच्या आदिवासी शासकीय वसतिगृहात नाविन्यपूर्ण असा संगणक कक्ष व अभ्यासिका केली असून येथील बदलत्या वातावरणात मुलांना चांगल्या पद्धतीने शिक्षण घेता यावे व अभ्यास करता यावा यासाठी AC व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत एमपीएससी अंतर्गत जिल्हा सांख्यिकी अधिकारी, ३ अभियंते तसेच पोलिस विभागातही कित्येक विद्यार्थी यशस्वी पणे अभ्यास करून  गेलेले आहेत. या वसतिगृहात स्वच्छता, विविध सुख सोई याबाबत लवकरच आयएसओ मानांकन मिळणार असल्याचे रविंद्र गजबिये यांनी सांगितले.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-01


Related Photos