देशभरात मोटर व्हेइकल कायदा आजपासून लागू होणार , नियमभंगासाठी आता पाच ते दहापट दंड


वृत्तसंस्था / नवीदिल्ली : देशभरात मोटर व्हेइकल कायदा आजपासून लागू होणार आहे. यामुळे  आजपासून तुम्हाला कोणतंही वाहन चालवताना केलेली कोणतीही चूक भारी पडू शकते.   आता कुठल्याही नियमभंगासाठी पाचपट तर काही बाबतीत दहापट दंड आकारला जाणार आहे. कमीत कमी एक हजार ते अगदी २५ हजार रुपयांपर्यंत दंड या नव्या कायद्यांतर्गत बसू शकतो.
 लायसन्स न बाळगल्यास पाच हजार रुपये दंड आहे, जो आतापर्यंत केवळ ५०० रुपये होता. नशेत गाडी चालवण्यास आतापर्यंत दोन हजार रुपये दंड आकारला जात होता, तो आता थेट १० हजार रुपये करण्यात आला आहे. केवळ दंडच नव्हे तर नियमभंग केल्यास तुरुंगात जाण्याचीही वेळ येऊ शकते. 

कोणत्या नियम भंगासाठी किती दंड ?

हेल्मेन न घालणे -  १०० रुपये  ऐवजी  आता १,००० रुपये दंड आणि तीन महिन्यांपर्यंत लायसन्स रद्द 

विना परवाना वाहन चालविणे - आधी ५०० रु., आता ५ हजार रुपये दंड. 

दुचाकी अतिरिक्त भार - आधी १०० रु., आता २ हजार रुपये दंड. 

सीट बेल्ट न लावल्यास - आधी १०० रुपये, आता १००० रुपये दंड. 

वाहन चालवताना फोनवर बोलल्यास - आधी एक हजार रु., आता ५ हजार रु. दंड   Print


News - World | Posted : 2019-09-01


Related Photos