तेलंगणात पबजीच्या व्यसनापायी युवक आयसीयूत


वृत्तसंस्था / हैदराबाद :    तेलंगणात एका युवकाला पबजीचं इतकं व्यसन लागलं की त्याच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्याने  त्याला आयसीयूत दाखल करावं लागलं .
 १९ वर्षीय तरुण बीएससीच्या दुसऱ्या वर्षाला शिकतो. त्याचं वजन अचानक कमी झालं, त्याला निर्जलीकरणाचा (पाण्याची कमतरता) त्रास झाला. PUBG च्या स्पर्धेमुळे तो मानसिक तणावातही होता. गेल्या महिन्यात २६ तारखेला त्याला रुग्णालयात आणण्यात आलं. त्याच्या डाव्या पायची आणि हाताची हालचाल थांबली होती. न्यूरोफिजिशियन डॉ. के. विनोद कुमार म्हणाले की 'त्याचा फोकस केवळ गेमवर असायचा. परिणामी त्याने खाणं-पिणं, झोपणं सोडलं होतं. तो दररोज ६-७ तास खेळायचा आणि यादरम्यान त्याचं वजन ३-४ किलोंनी कमी झालं होतं.' 
डॉ. कुमार म्हणाले, 'त्याला जेव्हा रुग्णालयात आणलं तेव्हा तो पूर्ण शुद्धीत नव्हता, नीट उत्तरं देत नव्हता. त्याच्या आईने सांगितलं की तो रात्री ९ वाजल्यापासून पहाटे ३-४ वाजेपर्यंत खेळत असायचा. नंतर तो वर्तमानपत्र वाटायला जायचा. दिवसा कॉलेज असायचं, तेव्हाही संधी मिळेल तेव्हा तो पबजी खेळायचा. सुट्टी असली की संपूर्ण दिवस हा गेम खेळत बसे.'   Print


News - World | Posted : 2019-09-01


Related Photos