पुढचा विरोधी पक्ष वंचित बहुजन आघाडी असेल : फडणवीस यांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला


वृत्तसंस्था / नांदेड : सध्या भाजपमध्ये काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांची आवक जोरात सुरू असून अजून कोणते नेते येणार हे लवकरच कळेल, असे सांगत पुढचा विरोधी पक्ष वंचित बहुजन आघाडी असेल, असे सूतोवाच करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला लगावला.  नांदेड येथे  बैठकीत ते बोलत होते.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनेही यात्रा काढल्या आहेत; परंतु त्यांच्या यात्रांना कुठेही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी सत्तेवर असताना लोकांसाठी काही केलेले नाही, तसेच विरोधी पक्ष म्हणूनही त्यांनी व्यवस्थित काम केले नाही.  त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप - सेना महायुतीला घवघवीत यश मिळेल, असा ठाम विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. 
  Print


News - Rajy | Posted : 2019-09-01


Related Photos