कोनसरीजवळ कारचा टायर फुटल्याने एकाचा मृत्यू, एक गंभीर


 विदर्भ   न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / आष्टी : 
जामगिरीवरून आष्टीकडे येत असताना अचानक कारचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात कारमधील एकाचा मृत्यू झाला  तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज ३१ ऑगस्ट  रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास आष्टी - चामोर्शी मार्गावरील कोनसरी टी- पॉईंट जवळ  घडली.
ज्ञानेश्वर चापले रा. अनखोडा असे मृतकाचे नाव आहे. तर प्रभाकर फुलझेले (५०) रा. जामगिरी असे गंभीर जखमीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार आज दुपारच्या सुमारास जामगिरी येथून एमएच-३३ व्ही -२५७५ क्रमांकाच्या कारने मृतक ज्ञानेश्वर चापले, गंभीर जखमी प्रभाकर फुलझेले, चालक रणजित मेश्राम व धम्मदीप मेश्राम आष्टीकडे येत होते. दरम्यान कोनसरी टी-पॉईंटजवळ  अचानक कारचा टायर फुटल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून अपघात झाला. यामध्ये ज्ञानेश्वर चापले व प्रभाकर फुलझेले गंभीर जखमी झाले. त्यांना प्राथमिक उपचारासाठी आष्टी ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले. मात्र जखमींपैकी ज्ञानेश्वर चापले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गंभीर जखमी प्रभाकर फुलझेले यांना प्राथमिक उपचारानंतर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. चालक रणजित मेश्राम व धम्मदीप मेश्राम यांना किरकोळ मार लागला.
घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहेत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-31


Related Photos