वरोरा पोलिसांनी केली दोन दुचाकीचोरांना अटक, १० दुचाकी वाहने जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
वरोरा पोलिसांनी दोन दुचाकी चोरांना अटक केली असून त्यांच्याकडून १०  दुचाकी वाहने जप्त करण्यात आले आहेत. क्षितीज वासुदेव गेडाम (३२)  रा. अपूर्वा नगर वरोरा आणि राजु यादवराव सुरपाम (४२)  अशी आरोपींची नावे आहेत.
२९  ऑगस्ट  रोजी वरोरा पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीबाबत तक्रार प्राप्त झाली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान गोपनिय माहितीवरून अपूर्वा नगर येथील एकास ताब्यात घेतले. त्याच्या घरी एक विना क्रमांकाची संशयीत दुचाकी आढळून आली. दुचाकी ताब्यात घेवून क्षितीज गेडाम याला अटक करण्यात आली. सदर आरोपीची कसून चौकशी  केली असता यापूर्वीही दुचाकी चोरी केल्याचे त्याने सांगितले. काही दुचाकी वाहने राजु सुरपाम याला विक्री केल्याचे त्याने सांगितले. राजु सुरपाम याला ताब्यात घेवून त्याच्याकडून एकूण १०  दुचाकी जप्त करण्यात आल्या. 
सदर कारवाई पोलिस अधीक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे  यांच्या मार्गदर्शनात वरोरा पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक विनित घागे, सहाय्यक फौजदार दौलत चालखुरे, पुरूषोत्तम पेंढारकर, विलास बल्की, दीपक दुधे, सुरज मेश्राम यांनी केली आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-08-31


Related Photos