भव्य बैलपोळा स्पर्धा आयोजित करून पोलिस विभागाने केले बळीराजाचे कौतुक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्यात ग्रामीण भागात पारंपारीक पध्दतीने पोळा सण साजरा केला जातो. या सणाला अणिक खास बनवून बळीराजाच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याच्या उद्देशाने  पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात भव्य बैलपोळा स्पर्धा आयोजित करून बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
सदर स्पर्धा गडचिरोली, कुरखेडा, धानोरा, पेंढरी, अहेरी, एटापल्ली, भामरागड, जिमलगट्टा, हेडरी तसेच सिरोंचा अशा १०  उपविभागीय स्तरावर पार पडली. जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील अनेक शेतकऱ्यांनी  स्पर्धेत सहभाग घेतला. प्रत्येक उपविभागीय स्तरावर झालेल्या स्पर्धेत उत्कृष्ट रंगरंगोटी व सजावट असलेल्या प्रथम क्रमांकाच्या बैलजोडीस ३ हजार रूपये, द्वितीय २ हजार रूपये आणि तृतीय १ हजार रूपये रोख पारितोषिक देवून सन्मानित करण्यात आले. पोलिस दलाच्या या नाविण्यपूर्ण उपक्रमामुळे जनतेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. पोळा सणानिमित्त शेतकऱ्यांचे  व शेतकऱ्यांनी जिवापाड जपलेल्या बैलजोडीचा सन्मान प्रथमच करण्यात आला. यामुळे पोलिस विभागाचे कौतुक होत आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-31


Related Photos