कान्पा - नागभीड मार्गावर दुचाकीची उभ्या टिप्पर ला धडक : १ जण ठार , १ जण गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / नागभीड :
कान्पा मार्गे नागभीड कडे येत असलेल्या भरधाव दुचाकीने रस्त्यावर असलेल्या नादुरुस्त टिप्पर ला धडक दिल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यु झाला तर त्याचा सहकारी युवक गंभीर जखमी झाला आहे . हा अपघात काल शुक्रवारी रात्रौ ८ वाजताच्या सुमारास  कान्पा - नागभीड मार्गावर झाला . अपघात एवढा भीषण  होता कि दुचाकीने टिप्पर ला धडक दिली असता दुचाकी टिप्परच्या मागील बाजूस अर्ध्यापर्यंत गेली . त्यात दुचाकी चालकाचा जगत मृत्यू झाला . 
मयूर ठाकरे असे मृतकाचे नाव असून तो ब्रम्हपुरी तालुक्यातील कालेता या गावचा आहे . गंभीर जखमीला नागपूर येथे रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आपले आहे .  Print


News - Chandrapur | Posted : 2019-08-31


Related Photos