गोंदिया येथील पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया :
गुन्ह्याच्या तपासामध्ये मदत करतो तसेच न्यायालयातून सुटण्यासारखी केस तयार करतो असे सांगून १२००  रुपयांची लाच स्वीकारणारा सहाय्यक फौजदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. 
शब्बीर अहमद शेख (५४) असे सहाय्यक फौजदाराचे नाव आहे.  तक्रारदार   फुलचुरपेठ, कवलेवाडा रोड गोंदिया येथील  रहीवासी असुन त्याच्या  विरूध्द  गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात  येथे अप क्र. 149/19 कलम  324,452,294,504,506,34 भादंवि अन्वये गुन्हा नोंद असुन सदर गुन्हयात तक्रारदार व त्यांच्या
भावांना अटक करण्यात आले होती.  न्यायालयाने त्यांना जामीनावर सोडले होते. सदर गुन्ह्याचा  तपास  सपोउपनि शब्बीर शेख   करीत आहेत. तक्रारदारास व त्यांच्या भावांना सपोउपनि  शब्बीर शेख यांनी अटक करून कोर्टात हजर केले . त्यावेळी सदर तपासामध्ये तुम्हाला मदत करतो व  कोर्टातुन केस सुटण्यासारखी केस तयार करतो असे म्हणुन  ५ हजार रुपये लाच रकमेची मागणी केली. तक्रारदार याची लाच रक्कम देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया येथील  अधिकाऱ्यांना  भेटून तक्रार नोंदविली.
 लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया चे पोलीस उपअधीक्षक  रमाकांत कोकाटे यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीय रित्या शहानिशा  करून स.फौ. शब्बीर अहमद शेख यांचे  विरूध्द योजनाबध्दरित्या ३० ऑगस्ट रोजी यशस्वी सापळा रचला.  स.फौ. शब्बीर अहमद शेख   यांनी १२००  लाचेची मागणी करून लाचरक्कम स्विकारतांना  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने रंगेहात पकडले. सहाय्यक फौजदार शब्बीर अहमद शेख  त्यांच्या विरूध्द पोलीस स्टेषन गोंदिया ग्रामीण  येथे गुन्हा दाखल करण्यात आला.  
  Print


News - Gondia | Posted : 2019-08-31


Related Photos