पवनी येथे भरला ट्रॅक्टर पोळा , उत्स्फूर्त प्रतिसाद


- ५० च्या  वर ट्रॅक्टर  सहभागी 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / पवनी  :
आज बैल पोळ्याची सर्वत्र धूम असून मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात येत आहे.  तर आज अनेक ठिकाणी बैला सोबतच शेतीच्या  कामाची जबाबदारी  ट्रॅक्टर वर असल्यामुळे प्रथमच भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे माँ चंडिका देवस्थान कमिटीच्या  भव्य पटांगणावर चक्क ट्रॅक्टर पोळा आयोजित करण्यात आला. तर अनोख्या पोळ्यात तालुक्यातील ५० हुन अधिक ट्रॅक्टर यात सामील झाले होते.  या आगळ्या वेगळ्या ट्रैक्टर पोळयाचे आयोजन जय किसान शेतकरी संघटना पवनी च्या वतीने आयोजित करण्यात आले.
 आजच्या  आधुनिक व स्पर्धेच्या  युगात आज शेतीचा बहुतांश कामाची जबाबदारी ही  ट्रॅक्टर द्वारे करण्यात येत  असून त्या द्वारे कमी कालावधीत जास्त कामे आज निघतात त्यामुळे ज्या प्रमाणे शेतकरी आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत पोळा हा सण मोठ्या थाटात साजरा करतो त्याच प्रमाणे  ट्रॅक्टर मालकाने देखील अनोखी शक्कल लढवीत हा अनोखा   ट्रॅक्टर पोळा भरविण्यात आला.  तर शहर वासियांनी देखील आपली उपस्थिती दर्शवित या पोळ्याला आपली पसंती दर्शविली. या ट्रॅक्टर च्या पोळ्याला उपस्थित ट्रॅक्टर चालकाला शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. या कार्यमाला भंडारा क्षेत्राचे आंध्र   रामचंद्र अवसरे, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, नगर विकास आघाडीचे अध्यक्ष विलास काटेखाये, न.प.उपाध्यक्ष कमलाकर रायपूरकर, तोमेश्वर पंचभाई, पोलिस निरीक्षक यशवंत सोलसे, विकासभाऊ राऊत, शंकर तेलमासरे,प्रकाश पचारे, तोमेश्वर पंचभाई, डॉक्टर किशोर मोटघरे, बंडू हटवार, जिल्हा जातीय सलोखा समिति सदस्य प्रशांत पिसे, महादेव शिवरकर,  भागवत आकरे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष रवींद्र मुंडले, उपाध्यक्ष राकेश बिसने, सचिव बालू मुंडले, समिती सदस्य रविंद्र मुंडले, सोपान पिसे, सज्जन मुंडले, सोपान मोटघरे, दिलीप भोंगे, विजय जिभकाटे, विशाल बावनकर, सुधीर खोब्रागडे, ताराचंद तुळस्कर आदींनी केले.   Print


News - Bhandara | Posted : 2019-08-30


Related Photos