चार वर्षीय विद्यार्थिनीच्या विनयभंगप्रकरणी स्कूल बस चालकासह चौघांवर बल्लारपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


- पोक्सो कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर :
शहरातील बीटीएस फ्राट येथील क्रिएटीव्ह माईन्ड प्रि स्कूल मध्ये शिक्षण घेत असलेल्या चार वर्षीय विद्यार्थीनीसोबत स्कूल बस चालक आणि त्याच्या चार साथीदारांनी अश्लिल चाळे करून विनयभंग केला. याप्रकरणी चिमुकलीच्या वडीलांच्या तक्रारीवरून स्कूल बसचालकासह त्याच्या ३ साथीदारांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार आरोपी विक्की चितावार हा क्रिएटीव्ह माईन्ड प्रि स्कूल चे संचालक नजीम खान यांच्या टाटा मॅजीक स्कूल बसमध्ये चालक आहे. स्कूल बस ने शाळकरी मुलांना शाळेत ने - आण करण्याचे काम तो करतो. नेहमीप्रमाणे काल २८ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान शाळा सुटल्यानंतर स्कूल बस घरासमोर आली. यावेळी स्कूल बसमध्ये तीन अनोळखी व्यक्ती बसले होते. यावेळी ते चिमुकलीसोबत काहीतरी करीत असल्याचे फिर्यादीच्या निदर्शनास आले. चिमुकलीच्या अंगा - खांद्यावरून, गालावरून हात फिरवीत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी पिडीत मुलगी घाबरलेल्या अवस्थेत दिसत होती. याबाबत चालक विक्की याला विचारणा केली. यावेळी त्याने उध्दटपणे उत्तर देत माझे मित्र आहेत असे सांगितले. यानंतर पिडीतेच्या वडीलाने थेट पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी शहनिशा करून चारही आरोपींविरूध्द कलम ३५४ , ३५४ (अ), ३४ भादंवि सह कलम ११ , १२, १६ , १७ , बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा पोस्को २०१२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-08-29


Related Photos