मुधोली तुकूम येथिल सरपंच, उपसरपंच व ग्रा.प. सदस्यांसह अनेकांनी केला भाजपात प्रवेश
- आ.डॉ. देवराव होळी यांनी दुपट्टा टाकून केले भाजपात स्वागत
- भाजपाचे शिर्षस्थ नेतृत्वासह आ.डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून घेतला भाजपात प्रवेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : भारतीय जनता पार्टीचे शीर्षस्थ नेतृत्व तथा गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आ.डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुधोली तुकूम येथील सरपंच शंकूतला डाकोटे, उपसरपंच दिलीप वर्दलवार, ग्राम पंचायत सदस्य रेखा कलसार, नामदेव वर्दलवार, नवनाथ सिडाम, दिपक शेडमाके, ईश्वर निमजे, ईश्वर नागापुरे, प्रतीक देवतळे, अनुप गोंगले, मधुकर गौरकार, अनिश देवतळे, मधुकर झाडे, बंडू पेंदोर सोमेश्वर पुरमवार, विक्की देवतळे, यांचे सह उपस्थित कार्यकर्त्यांनी आ.डॉ. यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून भाजपामध्ये प्रवेश घेतला.
याप्रसंगी आ.डॉ. देवराव होळी यांनी १० लक्ष रुपयाचे सभागृह बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, रामदास हुलके, ओबीसी आघाडी तालुका महामंत्री दिपक वासेकर, सोनू देवतळे उपस्थित होते.
News - Chandrapur