कोरची तालुक्यातील मसेली येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा अकस्मात मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची :
तालुक्यातील मसेली येथील  शासकीय आश्रमशाळेतील    विद्यार्थ्याचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना आज २८ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा सहा वाजता घडली. राजेश सबेसिंग कुमरे(१३)  रा. लेकुरबोळी  असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.   तो मसेली आश्रमशाळेत इयत्ता ७ व्य वर्गात शिकत होता. 
राजेश कुमरे हा मसेली येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहात असताना  पहाटे त्याला अस्वस्थ वाटू लागले. शिक्षकांनी त्याला  पहाटे  ५.१० वाजता कोरची येथील ग्रामीण  रुग्णालयात दाखल  केले. डॉ. कावडकर यांनी  त्या विद्यार्थ्यावर उपचार केले.  मात्र, सकाळी ६.१७ वाजता डॉक्टरांनी  त्याला मृत घोषित केले.   राजेशला रुग्णालयात दाखल केले, तेव्हा तो बेशुद्ध होता. त्याचे पोट फुगले होते.    त्याची प्रकृती केव्हापासून बिघडली किवा त्याला कसे वाटायचे याविषयी शिक्षक काहीही सांगू शकले नाही. त्याचा मृत्यू विषारी सर्पदंशाने झाला असावा, अशी शंका डॉ.कावडकर यांनी व्यक्त केली. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक  गोडबोले  करीत आहेत.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-28


Related Photos