मारकबोडी येथे शाॅर्ट सर्कीटमुळे शेकडो इलेक्ट्रिक साहित्य निकामी, अंदाजे २० लाखांचे नुकसान


- १३० एलईडी टीव्ही, ७० पंखे, ६०० बल्ब, २० कुलर, ६ फ्रीज, १ जनरेटर आणि शेकडो सेट टाॅप बाॅक्स निकामी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
दीपक बोलीवार / डोंगरगाव :
गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून ११ किमी अंतरावर असलेल्या मारकबोडी गावात विद्युत जनित्राच्या तारांमध्ये झालेल्या शाॅर्ट सर्कीटमुळे गावातील अनेक कुटूंबांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. गावातील नागरीकांचे १३० एलईडी टीव्ही, ७० पंखे, ६०० बल्ब, २० कुलर, ६ फ्रीज, १ जनरेटर आणि शेकडो सेट टाॅप बाॅक्स निकामी झाले आहेत. संपूर्ण साहित्य मिळून जवळपास २० ते २२ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
विजतारांच्या घर्षणामुळे अचानक विजेचा दाब वाढल्यामुळे साहित्यांचा एकदम आवाज झाला. सर्व साहित्य निकामी झाले. जवळपास १३ लाख रूपये किमतीचे दुरदर्शन संच तसेच इतर साहित्य निकामी झाले. संत जोसेफ वसतीगृहातील २ लाख रूपये किमतीचा जनरेटरसुध्दा निकामी झाला आहे. अनेकांचे मोबाईल चार्जींगसाठी लावले होते. हे मोबाईलसुध्दा निकामी झाले आहेत. गावातील कुटुंबांची संख्या जवळपास २६० एवढी आहे. संपूर्ण गावातील नागरीकांचे साहित्य निकामी झाल्यामुळे लाखोंचा आर्थिक फटका बसला आहे. नागरीकांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-28


Related Photos