गळक्या वर्गखोलीत चिमुकले गिरवित आहेत धडे ? ; कोरची तालुक्यातील जि.प.शाळा मोहगाव येथील प्रकार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची :
आदिवासी बहुल कोरची तालुक्यात अलीकडे राज्य शासन  शाळांच्या भौतिक सुविधाकडे लक्ष केंद्रित करीत आहे तर दुसरीकडे गळक्या वर्गखोलीत चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहे एवढेच नव्हे तर पावसाळ्यात त्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहे . हा प्रकार कोरची तालुक्यात पंचायत समिती ,अंतर्गत येत असलेला केंद्र बेडगाव, मोहगाव जि.प .शाळेत सुरु आहे. 
मात्र या  प्रकाराला प्रशासनापुढे सांगावे कस ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.  गळक्या वर्गखोलीचे डागडुजी करण्यात आली आहे. त्यामुळे कामाचा निष्कृष्टपणा की प्रशासनाचे  दुर्लक्ष असा सवाल उपस्थित होवु लागला आहे.
बेडगाव अंतर्गत मोहगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वर्ग १ ली ते ५ वी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, मात्र शाळेच्या इमारतीतील एक वर्ग खोलीला गळती लागलेली आहे , थोडाही पाऊस आला की पाण्याची टीप टीप सुरू होते , त्या पाण्यात चिमुकल्याला विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागते . ती पाण्याची टीपटीप कधी कधी  तर वर्गखोलीला तलावाचे स्वरूप ही आणून देत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आणून शालेय प्रशासन शिक्षणाचे धडे देत आहेत का ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे .परंतु शालेय प्रशासन नाही या संदर्भात हतबल झाल्याचे दिसून येत आहे.
वर्गखोली ची एकदा नव्हे तर दोनदा डागडुजी करण्यात आली  त्यावर निधी खर्च करण्यात आले .परंतु पाण्याच्या टीप-टीप पासून मुक्तता मिळाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पालक चांगलेच चिंतेत पडलेले आहेत . जि.प.प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रित करावे अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. जिल्हा परिषद शाळा  येथे इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंत वर्ग आहेत.  या वर्गात ३९ विद्यार्थी आहेत व यांना  शिकविण्याची जबाबदारी दोन शिक्षकांच्या खांद्यावर आहे. मुख्याध्यापक  एफ.डी.फुलकवर, सहाय्यक शिक्षक व्हि.एम.कोडापे, यांना एकाच वर्गखोलीत शिक्षणाचे धडे  द्यावा लागत आहे .त्यामुळे विद्यार्थ्यांचे  शैक्षणिक नुकसान  होत आहे . एका वर्गखोली निरंलिखित चा प्रस्ताव पाठविला आहे परंतु अजून पर्यंत इमारत मंजूर झाली नाही. याकडे जिल्हा परिषद सदस्य यांनी लक्ष देऊन समस्या निवारण करण्यात यावे व आठ दिवसांत इमारत मंजुर करण्यात यावी नाहीतर शाळेत विदयार्थी पाठवणार नाही अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कोमल दूधकवर, रुकमन घाटघूमर,  कुवरीया बागडेरिया ,सुनिता मडावी, पालक वर्गणी केली आहे .
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-28


Related Photos